पेशी अंगके

पेशी अंगके 


1) केंद्रक (Nucleus):

  • केंद्रक हा पेशीतील मोठयात मोठा मध्यवर्ती घटक आहे.  केंद्रक गोल आकाराचे असते.
  • केंद्रकाभोवती असणारे केंद्रपटल सच्छिद्र असते.
  • केंद्रकात डीएनए पासून बनलेली गुणसूत्रे असतात.
  • डीएनए च्या ठराविक लांबीच्या धाग्यास जनुक म्हणतात.
  • केंद्रक पेशींच्या सर्व कार्यावर नियंत्रण ठेवते.
  • पेशी विभाजनात भाग घेते.
  • केंद्रकातील गुणसूत्रांवरील जनुकांनुसार आनुवंशिक गुण पुढील पिढ्यांमध्ये संक्रमित होतात.

2) आंतर्द्रव्य जालिका (Endoplasmic Reticulum):

  • ही पेशीतील परिवहन संस्था आहे.
  • पेशीद्रव्याच्या आंतर्भागात सूक्ष्म नाभिकांची एक जालिका पसरलेली असते, त्या नलिकापटलाने सीमित असतात. या जालीकेला आंतर्द्रव्य जालिका असे म्हणतात.
  • आंतरजालीकेच्या बाह्यांगावर बारीक सूक्ष्म रायबोझोम्स असतात.

3) रायबोझोम्स (Ribosomes):

  • आंतर्द्रव्य जालीकेवर असतात.
  • ह्या रायबोनल आरएनए आणि प्रथिनांपासून बनलेल्या असतात.
  • प्रथिने संश्लेषणाचे कार्य असते.

4)  हरित लवके (Chloroplasts):

  • हरित लवके फक्त वनस्पती पेशींमध्ये असतात.
  • हरित लवके प्रकाश संश्लेषणाचे कार्य करतात.

5) तंतूकणिका (Mitochondria):

  • तंतूकणिका वेगवेगळ्या आकारांचे असतात.
  • प्रामुख्याने ते लांबट गोल आकाराचे आढळतात.
  • प्रत्येक तंतूकणिकेस (Mitochondria) दुहेरी भित्तिका असून आतील भित्तिकेला घड्या पडलेल्या असतात.
  • पेशीतील अन्नापासून ऊर्जा निर्माण करण्याचे काम मायटोकाँड्रिया करते.
  • पेशीला जरूर असेल तेव्हा ऊर्जा पुरवते, म्हणून याला पेशींचे ऊर्जाकेंद्र म्हणतात.

6) गोल्गीकाय/ गॉल्जीपिंड (Golgi Body) :

  • पेशिरसातील चपटे पटल  असणाऱ्या पिशव्यांना गोल्जीपिंड म्हणतात.
  • यामध्ये विकर साठवले जातात.
  • गोल्गीसंकुलाला पेशीतील स्त्रावी अंगक असे म्हणतात.

7) तारक-काय (Centrosomes):

  • फक्त प्राणी पेशींमध्ये असतात.
  • पेशीविभाजनामध्ये महत्वपूर्ण कार्य करतात.

8) लयकारिका (Lysosomes):

  • लयकारिका साध्या एका आवरणाने बनलेली पिशवी असते त्यांना कोश असेही म्हटले जाते.
  • लयकारिका या गॉल्जीपिंड मार्फत तयार केल्या जातात. यांच्यामध्ये विविध पाचक विकरे (Digestive Enzymes) असतात.
  • वनस्पती पेशीत लयकारिका कमी प्रमाणात असतात.
  • पेशींमध्ये घडत असलेल्या विविध चयापचय क्रियानंतर जटील टाकाऊ कार्बनी पदार्थ तयार होतात. त्या पदार्थांचे पचन लयकारिका करत असतात म्हणून त्यांना पेशीतील टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट लावणारी संस्था असे म्हणतात.
  • पेशींवर हल्ला करणाऱ्या जिवाणू आणि विषाणूंसारख्या रोगजंतूंना लयकारिका नष्ट करतात म्हणून तिला पचन पिशव्या (Digestive Bags) असेही म्हणतात.
  • पेशींमध्ये बिघाड झाल्यास तेव्हा त्या पेशीतील लयकारिका फुटतात व त्यातील विकरे पेशींचे पचन करतात; म्हणून लायकारिकांना आत्मघाती पिशव्या (Suicidal -Bags) म्हणतात.
  • सजीवांना अन्न न मिळाल्यास लयकारिका पेशीत साठविलेल्या प्रथिने आणि मेद यांचा उपयोग करून शरीरात आवश्यक ऊर्जा पुरविण्याचे कार्य करतात.

9) रिक्तिका (Vacuole):

  • पेशीत नुकतेच आलेले व पेशीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर असणारे पदार्थ रिक्तिकेत असतात.
  • त्याचप्रमाणे पेशीतील टाकाऊ पदार्थ ही रिक्तिकेत असतात. म्हणून त्यांना Waste Deposite Bags असेही म्हणतात.
  • रिक्तिकांना ठराविक आकार नसतो. रिक्तिका एकेरी आवरणाने बनलेल्या असतात.
  • प्राणी पेशींमध्ये आकाराने लहान आणि एकपेक्षा अधिक तर वनस्पती पेशींमध्ये मोठ्या आकाराच्या एक किंवा अधिक रिक्तिका असतात. रिक्तिकांना स्थायू तसेच द्रव पदार्थाची साठवणूक करणाऱ्या पिशव्या असे म्हणतात.

No comments:

Post a Comment